पारोळा : पारोळा तालुक्यात भरधाव कारने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुसऱ्या कारमध्ये असलेले दाम्पत्य जागीच ठार झाले. ही दुर्घटना सोमवार, २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुधीर देवीदास पाटील (वय-४८) आणि त्यांची पत्नी ज्योती सुधीर पाटील (वय ४४) दोन्ही रा. लोणी ता. पारोळा ह.मु. गुजरात राज्य असे मयत झालेल्या दाम्पत्याची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,पारोळा तालुक्यातील लोणी गावातील रहिवाशी असलेले सुधीर पाटील हे आपल्या पत्नी ज्योती पाटील यांच्यासह गुजरात राज्यात वास्तव्याला होते. दरम्यान, लोणी गावातील नातेवाईकांचे ४ डिसेंबर रोजी लग्न असल्याने पाटील दाम्पत्य हे मुळ गावी जाण्यासाठी गुजरात राज्यातून आलेले होते. सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील फाट्याजवळ सुधीर पाटील हे कार क्रमांक (जीजे ०५ आरएच १२४७) ने लोणी गावी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून पाटील हे कार वळवत असतांना जळगावकडून धुळेकडे जाणारी भरधाव वेगाने जाणारी ऑडी कार क्रमांक (डीडी ०३ के ६९०३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत गुजरात येथून कारमध्ये आलेले दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गुजरात पासींग असलेली कारचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. तर ऑडी कारमधील जखमींना तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी फाट्याजवळ ही घटना घडल्यानंतर दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेची माहिती ळाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी एरंडोल ते धुळे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे दिसून आले.