श्री संत गुलाब बाबा महाअमृत महोत्सवाचा 37 वा वर्ष सोहळा उत्साहात संपन्न

---Advertisement---

 

श्री संत गुलाब बाबा महाअमृत महोत्सवाच्या 37 व्या वर्षानिमित्त तसेच श्री संत अवलिया उत्तम बाबा महानिर्वाण महोत्सव उत्साहात पार पडला. दि. 29 मार्च ते 30 मार्च 2026 या कालावधीत हा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला होता.


या महोत्सवात भजन, कीर्तन, मां गायत्री 5 कुंडी महायज्ञ, दहीहंडी, गोपाळकाला तसेच अन्नदान महाप्रसाद यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. हजारो भक्तांनी श्रींच्या चरण पादुकांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.


सदर महोत्सवाचे आयोजन श्री संत गुलाब बाबा भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत गुलाब बाबा भक्त परिवार प्रसिद्धी प्रमुख सोनू पाटील , राजुभाऊ शर्मा श्यामभाऊ बहेती (गव्यम दूध वाले), बालकृष्ण बहेती सर, एन. जी. पाटील (आबा), निंबा बाबुराव पाटील (किनोदकर), हरीभाऊ देशमुख तसेच गायत्री यज्ञ प्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.


महोत्सव शांतता व उत्साहात पार पडल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---