गुलाबराव देवकर यांच्याविरोधात न्यायालयात जाणार : ना. गुलाबराव पाटील

जळगाव: देवकर हे काही साधु नाही ते घरकुल खाऊन उभे राहिलेले आहेत. ज्या पक्षाला वाटतं त्यांनी देवकरांना घ्याव पण मी त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची संतप्त प्रतिक्रीया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.  गुलाबराव देवकर यांना कोणत्याही पक्षाने घ्यावं आणि अंगावर शिंतोळे उडवून घ्यावेत, असा इशारा देखील मंत्री पाटील यांनी दिला आहे.

गुलाबराव देवकर यांनी  जिल्हा बँक आणि मजूर फेडरेशनमधून मोठे कर्ज घेतले ते अजून फेडले नाही.  गुलाबराव देवकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला फसवलं आहे. हि शेतकऱ्यांची बँक आहे, या बँकेतून स्वतः कर्ज घेतलं असून हप्ते फेडत नाही. दुसरी महत्त्वाचीबाब म्हणजे गुलाबराव देवकरांनी फेडरेशनचे पैसे आहेत जे मजुरांचे पैसे आहेत ते स्वतः पतसंस्थेवर टाकून स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन ते पैसे त्यांनी दिलेलं नाही. सर्व मजूर सोसायट्यांच्या चौकशी करीत मी  डीडीआरला बोलविले आहे. चार सोसायट्यांचे दप्तर माझ्याकडे तयार आहे. ज्यामध्ये सरकारी नोकर ज्याच्या घरात आहे, जे आयटी रिटर्न भरतात अशा मजूर सोसायट्या आहेत. आणि त्यांचा हा बॉस आहे.

देवकरांना ज्या पक्षाला घ्यायचं त्यांनी घ्यावं.घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेला चार वर्ष  स्थगिती असल्याने ते घरात आहे. ती स्थगिती उठविण्याकरिता  मी कोर्टात जात आहे. त्यामुळे ते काही साधू नाही आहेत घरकुल खाऊन उभे राहिलेले ही माणसं आहेत मी यांना सोडणार नाही असा सज्जड दम मंत्री पाटील यांनी दिला आहे. घरकुल घोटाळा करून मोठे झालेल्या देवकरांच्या शिक्षेसाठी मी लढणार मी कोर्टात जाणार मी कोर्टात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.