Vhideo : “हर घर जल, हर घर नल”अंतर्गत मंत्री गुलाबराव पाटील यांचा ठाणे दौरा, पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा

ठाणे : राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज ठाणे जिल्ह्याचा दौरा केला. या त्यांनी  जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत कठोर शब्दात निर्देश दिले की, जलजीवन मिशनच्या अंतर्गत सर्व पाणीपुरवठा योजनांची कार्यान्वयन प्रक्रिया पूर्ण क्षमता वापरून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदारांशी चर्चा केली. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी पडघा, वाशिंद, आसनगाव, चेरपोली, खर्डी या ठिकाणी भेटी दिल्या.

या दौऱ्यादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा परिषद जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक प्रमोद काळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तन्मय कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री पाटील म्हणाले की, “हर घर जल, हर घर नल” हा देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे पूर्णत्व हे महत्वाचे आहे. याकरिता जलजीवन मिशनच्या प्रकल्पांची गती वाढवण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. ठाणे आणि शहापूर जिल्ह्यांच्या पाणीपुरवठा योजनांच्या आढाव्याला दिलेले महत्त्व आणि अद्याप प्रलंबित असलेल्या कामांची अडचणी शोधून त्या त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी जिल्ह्यातील धरणांच्या कामांचा सुद्धा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने धरणाच्या कामांच्या प्रगतीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सध्या 1 हजार 47 कामे सुरू असून त्यातील 720 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. 327 घरगुती नळजोडणी संबंधित कामे चालू आहेत. मात्र, काही कामे अडचणींमुळे थांबलेली आहेत, जसे की वनविभागाच्या परवानगीसाठी 4 कामे प्रलंबित आहेत, काही कामे जागेच्या वादामुळे अडचणीत आहेत, तर काही ठिकाणी रस्ता नसल्यामुळे अडकले आहेत.

 

मंत्री पाटील यांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या गतीला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत.