हरियाणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपचा कॉन्फिडन्स वाढला! अशा आहेत भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

Haryana Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. काही वेळाने या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. तत्पूर्वी या मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतचा निकाल लक्ष्यात घेतले असता भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरही लागू शकतो. म्हणूनच भाजपा तसेच काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. मतमोजणीत भाजपच्या आघाडीमुळे महाराष्ट्र भाजपचा कॉन्फिडन्स देखील वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय जाणून घेऊया

 

विकासासाठी डबल इंजिनचे सरकार गरजेचे- बावनकुळे

आगामी काळात महाराष्ट्रात महायुती सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान होईल, महाराष्ट्रातील जनतेला हे माहिती आहे की राज्याच्या आणि जनतेच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार राज्यात असणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे हरियाणातील जनतेने आम्हाला कौल दिला आहे त्याचप्रमाणे महारष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हेच चित्र बघायला मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत जर का आपण राहिलो, तरच राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. म्हणूनच हरियाणातील नागरिकांनी भाजपला मोठी साथ दिली आहे. असा विश्वासही भाजप प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केला.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?एक्सिट पोलनुसार हरियाणात भाजपाची पीछेहाट दाखवण्यात आली होती. मात्र त्यावेळीही मी भाजप हरियाणात आघाडीवर राहील असे म्हटले होते. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा असा एक वर्ग आहे जो सभेत आणि रस्त्यावर दिसत नाही. मात्र त्यांच्या मनात  पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यामुळे भाजपला मोठी मदत होते. हा वर्ग नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मागे उभा राहतो. त्यामुळे भाजपाला विजय मिळणारच असे रावसाहेब दानवे म्हणाले.