जळगाव : हरियाणा येथे भारतीय जनता पार्टी ला मिळालेल्या “यशाबद्दल भारतीय जनता पार्टी जळगावतर्फे विजय उत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यलयात फटाक्यांची आतिषबाजी करत, पेढे वाटप करुन जल्लोष करण्यात आला.
हरियाणात भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा सत्ता संपादित केली आहे. या विजयाचे जळगावात मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपा पक्ष कार्यलय येथे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
यावेळी दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, माजी उपमहापौर सुनील खडके, माजी नगरसेवक भगत बालाणी, रेखा वर्मा, भारती सोनवणे. रेखा कुलकर्णी मंगला बारी, पिंटू काळे, अमेय राणे, प्रकाश बालाणी, राजेंद्र घुगे पाटील, शक्ती महाजन, सुनील सरोदे, प्रकाश पंडित, बापू कुमावत, सतनामसिंग बावरी, पंकज जैन, विकी चौधरी आदींसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.