Summer Health Tips: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. त्यात जळगावाच्या तापमानाने (jalgaon temperature today) एप्रिल महिन्यातच ४४ अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाची अक्षरशाः लाहीलाही होत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे (Heatwave) उष्माघातासह आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे. अशात आरोग्याची काळजी (Health Tips) घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया आरोग्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात काय केले पाहीजे आणि काय करु नये.
अशी घ्या काळजी
- उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.
- उन्हाळ्यात हलके, हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे परिधान करावे. यासह दुपारच्या वेळेस बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री किंवा टोपी, शूज किंवा चप्पलचा वापर करावा.
- उन्हाळ्यात आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यानुसार उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळावे. यासह शिळे अन्न देखील टाळावे.
- शरीराला हायड्रेट राखण्यासाठी ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेयांचे नियमित सेवन करा.
- तुम्ही प्रवास करत असाल तर प्रवासात पाणी व कांदा सोबत ठेवा.
- मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा.
- तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा ठेवा.
- अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटून उपचार घ्यावा.
उष्माघात झाल्यास करा हे प्राथमिक उपाचार
ज्या व्यक्तिला उष्माघात झाला आहे. त्याला थंड जागी, सावलीखाली ठेवा. त्याचे संपूर्ण शरिरी ओल्या कपड्याने पुसून काढा. शक्य असल्यास त्याची अंघोळ घाला. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घालत त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करा.
- उष्माघाताने शरीरातील पाण्याची पातळी कमालीची कमी होते. अशा परिस्थितीत व्यक्तील ओआरएस किंवा लिंबू सरबत सारखे पदार्थ प्यायला द्या. जेणे करुन त्याचे शरीर रीहायड्रेट होईल.
- उष्माघात हा जीवघेणा ठरु शकतो. त्यामुळे उष्माघात झालेल्या व्यक्तिला ताबडतोब आरोग्य केंद्रात घेऊन जा.