---Advertisement---
जळगाव : भडगाव तालुक्यातील दोन ठिकाणी युरियाची साठेबाजी केल्याचे आढळून आल्याने कृषी विभागाच्या पथकाने त्यांचे परवाने निलंबित केले. शुक्रवारी (१८ जुलै) रोजी जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील एका कृषी केंद्रात दीड हजार गोण्या युरियाचा साठा केलेला आढळून आला आहे. या प्रकरणात या कृषी केंद्र चालकांचा परवाना सुनावणी घेऊन त्यानंतर निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे.
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे १ हजार ५०० गोण्या पोरवाल नावाच्या कृषी केंद्रात साठे बाजी केल्याचे कृषी विभागाच्या पथकाला आढळून आले. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थित या युरीयाची विक्री झाल्यानंतर या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या या भरारी पथकात जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ मस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांचा सहभाग होता.
---Advertisement---
भडगाव येथे एका तक्रारदाराच्या तक्रारी वरुन दोन खत विक्रेत्यांच्या केंद्रावर जिल्हा स्तरीय भरारीपथकाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन्ही खत विक्रेत्यांनी दुकानात युरीया असूनही तक्रारदारास २ गोण्या युरीया विक्री करणे नाकारले होते. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख जि.प.चे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राठोड आदींच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून भडगावमध्ये कारवाई केली.
युरीया २६६ ररुपयापेक्षा जास्त दराने विकणे, युरीयासोबत तर खते जबरदस्ती घेण्यास भाग पाडणे, युरिया दुकानात असूनही विक्री करण्यास नकार देणे यासारखे प्रकार आढळून येत असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव शेवटपर्यंत गोपनिय ठेवण्यात येणार आहे. पद्मनाभ म्हस्के, भरारी पथक प्रमुख कृषी विभाग जि.प.