---Advertisement---
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि अनियमित आहारामुळे अॅसिडिटीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. जास्त प्रमाणात आम्लनिर्मिती झाल्यामुळे पोटात जळजळ, छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि अस्वस्थता अशा त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र, काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता.
‘हे’ आहेत प्रभावी घरगुती उपाय
- पुदिन्याची पाने
पुदिना पोटाला थंडावा देण्यास मदत करतो. त्यातील पाचक गुणधर्म अॅसिडिटी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होत असल्यास पुदिन्याची पाने चावून खाल्ल्यास आराम मिळतो. - ताकाचे सेवन
ताक पचनासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. दररोज एक ग्लास ताक पिल्याने पोट थंड राहते आणि अॅसिडिटीमुळे होणारी जळजळ कमी होते. अपचनावरही ताक प्रभावी उपाय आहे. - नारळपाणी
नारळपाणी शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. त्यातील फायबर पचन सुधारण्यास मदत करते. अॅसिडिटीमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नारळपाणी उपयुक्त ठरते. - जिऱ्याचे पाणी
जिरे पचनक्रिया सुधारण्यासाठी ओळखले जाते. जिऱ्याचे पाणी पिल्याने पाचकरस वाढतो आणि अॅसिडिटीसह पोटाच्या इतर तक्रारी कमी होतात. हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.









