मशिदींवरील भोंगे बंद करावेत ! विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची मागणी

---Advertisement---

तळोदा : येथील मशिदीवर अनधिकृत भोंगे लावले असून त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते, अशी तक्रार विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने तळोदा पोलिसात दिली आहे.

शहरातील मशिदींवरील बेकायदेशीरपणे बसविलेल्या लाऊडस्पीकरद्वारे ध्वनी प्रदूषण करीत आहे, त्यामुळे ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व विनियमन) नियम, २००० च्या नियम ५, ७ आणि ८ तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयाने महेश विजय बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर, २०१६ (६) एबीआर ५३३ या खटल्यात निश्चित केलेल्या ४५ डेसिबलच्या मयदिचे उल्लंघन करत आहे.

सक्षम प्राधिकरणांविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. संबंधित पोलिस स्टेशन यांनी अनधिकृत भोंगे व त्याच्या पासून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध पोलिस यंत्रणेने मुंबई पोलिस अधिनियमाच्या कलम ३८, ७०, १९३६ व १४९ अंतर्गत आवश्यक कारवाई करावी असे नमूद केले आहे.

निवेदनावर बजरंग दल जिल्हा संयोजक अजय ठाकरे, प्रखंड संयोजक वरुण राजपूत, विहीप प्रखंड प्रमुख दीपक चौधरी, मुकेश कोळी, हितेश तांबोळी, पवन सूर्यवंशी, कुणाल सूर्यवंशी, महेंद्र गुरव, नितीन वाघ, आनंद मराठे आदींच्या सह्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---