शहादा-खेतिया मार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

---Advertisement---

 

शहादा तालुक्यातील खेतिया-शहादा मार्गावर दराफाटा चौफुली परिसरात घडलेल्या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा सोबती गंभीर जखमी झाला आहे. धडक देणारे वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मृत तरुण दिलवर जयसिंग वास्कले (वय २५, रा. बायगोर, ता. पानसेमल, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) हा १८ मार्च रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या मित्रासोबत मोटारसायकलवरून प्रवास करत होता. दरम्यान, खेतियाकडून शहादाच्या दिशेने वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दिलवर वास्कले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्याच अपघातात संतोष खाज्या पटले (वय २५, रा. बायगोर, मध्यप्रदेश) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना कळविण्याऐवजी घटनास्थळ सोडून पळ काढला.

या प्रकरणी दिलवर वास्कले यांच्या वडिलांनी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(३), १२५(७) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ आणि १८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करत असून, प्रभारी अधिकारी हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---