How to block a credit card : तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे ! जाणून घ्या ‘हे’ नियम

How to block a credit card : तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायचं आहे, परंतु, संबंधित बँक किंवा वित्तीय संस्था क्रेडिट कार्ड बंद करत नसेल तर ते तुम्हाला दंड स्वरूपात पैसे देतील. याबाबत RBI ने क्रेडिट कार्ड बंद करण्यासंदर्भात नियम केले आहेत.  या नियमाचा फायदा कसा घेता येईल हे जाणून घेऊया.

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि ते वापरता येत नसेल, तर तुम्ही ते बंद करू शकता. याशिवाय जर तुमच्यासोबत फसवणूक होत असेल आणि तुम्हाला ती कायमची थांबवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकदा बँक क्रेडिट कार्ड बंद करण्यास टाळाटाळ करते. बँका कार्ड बंद करण्याच्या विनंत्या लवकर स्वीकारत नाहीत. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डवरील आरबीआयचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून बँक तुमचे क्रेडिट कार्ड बंद करत नसेल, तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमांचा हवाला देऊन कार्ड बंद करण्यास सांगू शकता.

असे आहेत नियम

जर तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड बंद करण्याबाबत बँकेला विनंती केली तरी बँक ती विनंती योग्य वेळी स्वीकारत नसेल तर बँककडून दररोज ५०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. तुम्ही विनंती केल्यानंतर बँकेला तुमची विनंती कधीही नाकारता येत नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे  क्रेडिट कार्ड जारी करणे आणि बंद करणे यासंदर्भात काही नियम  आहेत. या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाने त्याचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केला तर बँकेला 7 दिवसांच्या आत त्यावर काम सुरू करावे लागेल.

जर बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेने असे केले नाही तर पुढील सात दिवसांनंतर संबंधित बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकांना प्रतिदिन 500 रुपये दंड भरेल. परंतु, जर तुमच्या क्रेडिट कार्डवर थकबाकी असेल तर बँक तुम्ही विनंती नाकारू शकते. यात सर्वप्रथम तुम्हाला थकबाकी भरण्यास सांगण्यात येईल. हा नियम  RBI ने 2022 मध्ये हा नियम लागू केला होता.

ग्राहक मदत केंद्राशी संपर्क साधा 

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड असलेल्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करुन देखील तुमचे कार्ड बंद करण्याबाबत विनंती करु शकतात.

एसएमएस पाठवा

एमएमएस पाठवून आपण क्रेडिट कार्ड बंद करू शकतो. यात बँक खात्याशी मोबाईल क्रमांकावरुन एसएमएस पाठवून क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे,

नेट बँकिंग/मोबाइल ॲप

क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी नेटबँकिंग, मोबाईल ॲपचा वापर करता येईल. याकरिता तुमच्या खात्यात लॉग इन करावे. क्रेडिट कार्डवर क्लिक करुन ब्लॉक क्रेडिट कार्ड या पर्यायाची निवड करा. अशा पद्धतीने तुम्ही  तुम्ही बँकेच्या मोबाईल ॲपद्वारे क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती देखील करू शकता.

ईमेल

बँकेच्या ग्राहक पत्त्यावर ई-मेल पाठवून कार्ड ब्लॉक करता येते. तसेच कार्डशी संबंधित प्रत्येक माहिती तुम्ही ईमेलमध्ये टाकू शकता.

थकबाकी भरणे गरजेचे 

कार्डधारकांना संबंधीत कार्डवर सर्व देणी परत करावी लागतील. यात, ईएमआय, कर्ज, शिल्लक हस्तांतरण आदींचा समावेश आहे. सर्व देय रक्कम न भरल्यास बँक तुमचे क्रेडिट कार्ड बंद करणार नाही.

रिवॉर्ड पॉइंट वापरा

क्रेडिट करद्वारे व्यवहार केल्यानंतर त्या संबंधित कार्डवर रिवार्ड जमा होत असतात. हे रिवार्ड कार्ड धारकाने वेळोवेळी वापरले पाहिजे, कार्ड रद्द झाल्यानंतर बँक हि सुविधा रद्द करत असते.

रद्द केल्यानंतर कार्ड वापरू नका

तुम्ही  क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यानंतर ते पुन्हा वापरू नका.  ज्या तारखेला बंद करायचे आहे त्या तारखेच्या एक महिना आधी कोणताही व्यवहार करू नका. यामुळे बँक तुमचे कार्ड तपासेल आणि ब्लॉक करेल. कोणताही व्यवहार बाकी असल्यास तो ब्लॉक केला जाणार नाही.