---Advertisement---

ICC Champions Trophy 2025 : अखेर अंदाज खरा ठरला, पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा भारताचा निर्णय योग्यच, सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याच संकट

by team
---Advertisement---

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत, पाकिस्तानला भारताविरोधीतील सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने एकच रोष आहे. तर दुसरीकडे यजमान देशालाच दहशतवादी हल्ल्याची भीती वाटत आहे. या टुर्नामेंटच्या सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. खेळाडूंनाच पळवून नेण्याची भीती व्यक्त होत असल्याने आयसीसीचे सुद्धा धाबे दणाणले आहे. या ट्रॉफीत पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा भारताचा निर्णय योग्य असल्याचे समोर येत आहे. इस्लामिक स्टेट खुरसान प्रदेश (ISKP) ही संघटना खेळाडूच नाही तर परदेशी नागरिकांचे अपहरण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपहरण केल्यानंतर त्या बदल्यात संघटना त्यांच्या मागण्या लादणार असल्याचा सुगावा पाकिस्तानी गुप्तहेर संघटनांना लागला आहे. या नवीन अलर्टमुळे सामना होत असलेल्या शहरात आणि स्टेडियमबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

बदनामी टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त

पाकिस्तानची स्थिती रामभरोसे असल्याने येथे कोण, कुठून, केव्हा हल्ला करेल याचा विश्वास नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तालिबानसोबत पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. तर या छोट्या राष्ट्रात दोन स्वतंत्र देशाची मागणीला जोर आला आहे. आता बदनामी टाळण्यासाठी १३ हजार पोलीस आणि एका खेळाडूसाठी १०० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

या टुर्नामेंटमध्ये ८ संघ खेळत असून त्यातील अनेक सामने हे कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथील स्टेडियमवर होत आहे. मात्र अंतिम सामना कुठे खेळवायचा याविषयी अजून निर्णय झालेला नाही. भारताचे सर्व सामने हे दुबईत होत आहे. स्थानिक मीडियानुसार, लाहोरमध्ये सुरक्षेसाठी ८ हजार तर रावलपिंडीमध्ये ५ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर पाकिस्तान लष्कर सुद्धा सुरक्षा पुरवत आहे.

यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रदेशातील १३५ पोलीस निरीक्षक तर ७२ वरिष्ठ अधिकारीअसून २०० हून अधिक महिला पोलीस तर दहा हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी स्टेडियम परिसात तैनात आहेत. एका खेळाडूसाठी १०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. बदनामी टाळण्यासाठी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा जीवाचे रान करत आहेत.

श्रीलंकेला २००९ मध्येच झटका

२००९ मध्ये श्रीलंकेचा संघ सामन्यासाठी पाकिस्तानला गेला होता. कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ हॉटेलमधून लाहोर स्टेडियमकडे जात असतानाच संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे ६ हून अधिक खेळाडू जखमी झाले होते. यामध्ये महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि चामिंडा वास यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment