---Advertisement---

अनंतनागमध्ये आढळल्या हिंदू देव-देवतांच्या मूर्ती, झऱ्याचे नूतनीकरण सुरू असताना निघाले शिवलिंग

by team

---Advertisement---

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील एका झऱ्याच्या नूतनीकरणासाठी सुरू असलेल्या उत्खननादरम्यान अनेक प्राचीन हिंदू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहे. ऐशमुकाम परिसरातील सालिया येथील करकूट नाग येथे हा ऐतिहासिक ठेवा उजेडात आला असून, यामुळे या भागाच्या प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सालिया येथील प्राचीन झन्ऱ्याचे पुनरुज्जीवन आणि जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कामासाठी शनिवारी उत्खनन करत असलेल्या मजुरांना काही दगडी मूर्ती आणि शिवलिंग आढळले. त्यांनी तात्काळ ही माहिती अधिकाऱ्यांना दिली. या सापडलेल्या मूर्तीमुळे स्थानिक परिसरात कुतूहलाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कश्यप ऋषींच्या नावावरून या प्रदेशाला काश्मीर हे नाव पडले आहे. काश्मीरातील अनेक शहरांची नावे आजही हिंदू राजवटीच्या काळातील आहेत. काश्मीरमध्ये हिंदू आणि बौद्ध शासकांनी अनेक शतके राज्य केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मूर्तीचे वय आणि मूळ ओळखण्यासाठी त्यांची शास्त्रीय तपासणी केली जाईल. यासाठी त्यांना श्रीनगर येथील एसपीएस संग्रहालयात पाठवण्यात येणार आहे, जिथे संशोधक त्यांचा सखोल अभ्यास करतील.

कारकोट राजवंशाशी संबंध

हे स्थळ काश्मिरी पंडितांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण याचा संबंध ६२५ ते ८५५ या कालखंडात दरम्यान काश्मीरवर राज्य करणाऱ्या ‘कारकोट’ राजवंशाशी जोडला जातो. या घटनेची माहिती मिळताच जम्मू-काश्मीरच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---