केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वेंजारामूडू पोलिस ठाण्यात आलेल्या एका तरुणाने स्वतःच ६ जणांची हत्या केल्याची कबुली दिली, ज्यामुळे पोलीस अधिकारीही थक्क झाले. आरोपीचे नाव अफान असून, त्याने उंदर मारण्याचे विषही सेवन आल्याचेही सांगितले. त्याने आपल्या धाकट्या भावासह मैत्रीण, आजी, काका आणि काकू यांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
पोलिस तपासात उघड झाले भयंकर सत्य
प्राथमिक तपासात असे समोर आले की, आरोपी अफान पेरुमलाचा रहिवासी आहे. तो पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे मैत्रिणी फरजानासोबत त्याचे प्रेमसंबंध होते, मात्र कुटुंबाने या नात्याला विरोध केला होता. या रागातूनच त्याने तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्याचे उघड झाले.
हेही वाच : आनंदाची बातमी! राज्य शासनाकडून ‘नमो किसान सन्मान निधी’त वाढ; शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार…
५ जणांचा मृत्यू, आई अजूनही जीवन-मरणाच्या संघर्षात
अफानने त्याचा धाकटा भाऊ अहसान, मैत्रीण फरजाना, आजी सलमा, काका लतीफ, काकू शाहिदा आणि त्याची आई शमीना यांच्यावर हल्ला केला. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून, अफानची आई सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
अफानच्या वडिलांचा दावा
अफानचे वडील अब्दुल रहीम यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा काही आर्थिक संकटात नव्हता. तो नुकताच सहा महिन्यांच्या व्हिजिटिंग व्हिसावर सौदीहून परत आला होता. त्यामुळे त्याने हे कृत्य का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांचा तपास सुरू
या घटनेने संपूर्ण केरळ हादरले असून, पोलीस सखोल तपास करत आहेत. अफान सध्या रुग्णालयात असून, त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील तपासात या प्रकरणाचा नेमका गुंता उलगडेल, अशी शक्यता आहे.
.