---Advertisement---
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या पळवाटेत महाविकास आघाडीने वज्रमूठ उभारल्याचे दिसून येत आहे.
अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पुढाकार घेत महायुती (भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ) विरोधात उद्धवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मनसे यांच्यासह सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढणार असल्याचे माजी आमदार व पक्षाचे प्रभारी संतोष चौधरी यांनी सांगितले.
चौधरी यांनी ”यावेळी महापालिकेत आमचाच महापौर बसेल”, असा दावा करत शहरातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अस्वच्छतेवर सत्ताधाऱ्यांवर तटस्थ टीका केली. त्यांनी सांगितले की ”आम्ही नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत.”
तसेच यंदाच्या निवडणुकीत उद्धव सेना आणि मनसे यांच्यात युती झाल्यामुळे, या दोन्ही पक्षांसह इतर मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी लवकरच संयुक्त बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप-शिंदेसेनेची युती
दरम्यान, भाजप आणि शिंदेसेनेने महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर केली असून, सावध पवित्र घेऊन मैदानात उतरले आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेच्या रणांगणात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ‘काँटे की टक्कर’ रंगणार आहे.









