Gold Rate : सध्या पितृपक्ष सुरु असून, अशात आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात लक्षणिय वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज म्हणजेच दि. 25 रोजी सुवर्णनगरी जळगावात सोन्याच्या दरात 500 रुपयांनी वाढ होत 10 ग्राम सोन्याचा भाव 75 हजार 700 रुपयांवर पोहचला तर चांदीच्या दरातही प्रतिकिलो एक हजाराची वाढ होत एक किलोचा भाव 92 हजारावर पोहचला आहे.
गेल्या तीन-चार दिवसापासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही सोन्याच्या दरात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरातही वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ होत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 75 हजार 700 रुपयांवर पोहचले आहे. तर 22 कॅरेटचा भाव 69 हजार 300 वर पोहचला आहे. तर चांदीच्या भावात एक हजाराने वाढ होत एक कोलोचा भाव 92 हजारावर पोहचला आहे.
सोन्याच्या दरात झालेली ही वाढ ग्राहकांना मोठा धक्का देणारी आहे. सध्या पितृपक्ष त्यात आगमी नवरात्र आणि दिवाळी लक्षात घेता सोने चांदीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात पतृपक्षातच सोन्याचे भाव गडगडल्याने ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावरण आहेत.
पाच दिवसात इतकी झाली वाढ
सध्या पितृपक्ष सुरु असताना देखील सोनं-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यानुसार, गेल्या आठ दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या भावात 3 हजार तर चांदीच्या भावात 8 हजार रुपयांची वाढ झाली आहे.