---Advertisement---

भारत करणार के-६ क्षेपणास्त्राची चाचणी

---Advertisement---

भारत के-६ हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या समुद्री चाचण्यांसाठी सज्ज आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाद्वारे विकसित केले जात आहे. हे भारताच्या येणाऱ्या एस-५ वर्गाच्या अणू पाणबुडीमध्ये तैनात केले जाऊ शकते. आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र के-६ चा वेग आणि पल्ला ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षा चांगला असेल. हे क्षेपणास्त्र भारताला पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रू देशांचा अधिक प्रभावीपणे प्रतिकार करण्यास मदत करेल.

हैदराबाद येथील डीआरडीओच्या अॅडव्हान्स्ड नेव्हल सिस्टिम्स लॅबोरेटरीमध्ये विकसित केले जाणारे के ६ हे भारतातील सर्वात प्रगत आणि प्राणघातक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. अणू पाणबुडीतून सोडण्यात येणारे हे हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र भारताला जगातील सर्वात सक्षम देशांच्या यादीत स्थान देईल. ज्या एस-५ श्रेणीच्या अणू पाणबुड्यांमधून के-६ सोडण्यात येतील त्या सध्याच्या अरिहंत श्रेणीच्या पाणबुड्यांपेक्षा मोठ्या आणि अधिक शक्तिशाली असतील. त्या जड वॉरहेड्स आणि क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी विकसित केल्या जात आहेत. आगामी समुद्री चाचण्यांमुळे, के-६ क्षेपणास्त्र हायपरसॉनिक वेग गाठण्यास सक्षम असेल.


हायपरसॉनिक म्हणजे मॅक ७.५ म्हणजे ध्वनी वेगाच्या साडेसात पट किंवा ताशी ९,२०० किलोमीटर आहे. या क्षेपणास्त्राची ऑपरेशनल रेंज आठ हजार किलोमीटर आहे, म्हणजेच ते काही मिनिटांत शत्रूच्या क्षेत्रात खोलवर मारा करू शकते. हायपरसॉनिक वेगामुळे हे क्षेपणास्त्र बहुतेक क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणालींपासून वाचू शकते, ज्यामुळे शत्रूना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळत नाही.
एमआयआरव्ही तंत्रज्ञानाने सुसज्ज के-६ क्षेपणास्त्रात मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञान आहे. यामुळे एकाच क्षेपणास्त्राला अनेक लक्ष्यांवर अचूकतेने मारा करता येईल. यामुळे हल्ला आणि संरक्षण दोन्ही ऑपरेशन्समध्ये त्याची प्रभाविता वाढेल. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे आणि पारंपरिक दोन्ही प्रकारचे वॉरहेड्स वाहून नेऊ शकते, जे विविध लढाऊ परिस्थितींमध्ये वापरले जाऊ शकतात.

भारत निवडक देशांच्या गटात सामील होईल


त्याची गती आणि विध्वंसक क्षमता दोन्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षा जास्त असेल. के-६ क्षेपणास्त्र १२ मीटरपेक्षा जास्त लांब आणि २ मीटरपेक्षा जास्त व्यासाचे असेल. फक्त काही निवडक देशांमध्येच प्रगत हायपरसोनिक आणि एमआयआख्ही सज्ज क्षेपणास्त्र प्रणाली आहेत किंवा विकसित होत आहेत. हे देश म्हणजे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डम आणि के-६ क्षेपणास्त्राच्या यशस्वी सागरी चाचणीसह भारत त्यापैकी एक होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---