India Vs New Zealand : पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघाला पराभवानंतर ही कसोटी मालिकाही गमवावी लागली आहे. न्यूझीलंडने मालिकेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारतीय संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. यासोबतच भारतीय संघाचा सलग कसोटी मालिका विजयाचा रथ रोखला आहे.
हा पराभव भारतीय संघाला अत्यंत कष्टप्रद मानला जात आहे. भारताने एका तापानंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. याआधी २०१२-१३ च्या भारत दौऱ्यात इंग्लंडने भारतीय संघाला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. तेव्हापासून भारतीय संघाचे घरच्या मैदानावर वर्चस्व कायम होते. भारतीय संघाने सलग १८ मालिका जिंकल्या होत्या. परंतु , आता ही विजयी मालिका खंडित झाली आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर चौथा कसोटी सामन्यात पराभूत झाला आहे.
न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २५९ धावा केल्या. याला प्रत्युत्तरात देत भारतीय संघ पहिल्या डावात फक्त १५६ धावाच उभारु शकला. यात एकाही फलंदाजाला ४० धावा देखील करता आल्या नाहीत. तसेच न्यूझीलंडने दुसऱ्या डावातही शानदार कामगिरी करत २५५ धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३५९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. यशस्वी जैस्वालने एकट्यानेच लढा दिला. यात भारतीय संघाला दारुण पराभव झाला. तिला दुसऱ्या डावात केवळ २४५ धावा करता आल्या आणि लक्ष्यापासून ११३ धावा दूर राहिल्या.
न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला स्टार फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर. पुण्याच्या खेळपट्टीवर त्याने विलक्षण अशी कामगिरी केली. दोन्ही डावात त्याने ५ विकेट्स घेतल्या. मिचेल सँटनरने या सामन्याच्या डावात ५३ धावा देत ७ फलंदाजांना आपले बळी बनवले.