---Advertisement---
अमेरिकेतील विमान कंपनी एअरोस्पेसने मंगळवारी भारतीय लष्कराला तीन अपाचे हेलिकॉप्टर दिले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्कराला सहा हेलिकॉप्टर पुरवण्याच्या कराराचा भाग म्हणून कंपनीने एएच-६४ ई अपाचे हेलिकॉप्टर दिले. एएच-६४ अपाचे हे जगातील सर्वांत प्रगत बहु-भूमिका लढाऊ हेलिकॉप्टरपैकी एक आहे आणि याचा वापर अमेरिकी सैन्याद्वारे केला जातो.
हे अत्याधुनिक मंच भारतीय लष्कराच्या कारवाई क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करतील, असे लष्कराने एका समाज माध्यम पोस्टमध्ये म्हटले आहे. २०२० मध्ये बोईंगने भारतीय वायुदलाला २२ ई-मॉडेल अपाचे हेलिकॉप्टरची खेप दिली आणि भारतीय लष्करासाठी सहा एएच-६४ ई पुरवण्याचा करार केला.
भारतीय लष्कराच्या अपाचे हेलिकॉप्टरचा पुरवठा २०२४ मध्ये सुरू होणार होता. वायुदलाने सप्टेंबर २०१५ मध्ये २२ अपाचे हेलिकॉप्टरसाठी अमेरिकी सरकार आणि बोईंग लिमिटेडसोबत अब्जावधी डॉलर्सचा करार केला होता. या व्यतिरिक्त, संरक्षण मंत्रालयाने २०१७ मध्ये लष्करासाठी ४,१६८ कोटी रुपयांच्या बोईंगकडून शस्त्रास्त्र प्रणालींसह सहा अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मान्यता दिली होती.