Women’s Day दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून जागतिक पातळीवर साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे स्त्रियांनी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि लिंगभेद विरहित सामाजिक समता जागतिक पातळीवर प्रस्थापित करणे हे प्रमुख उद्देश आहेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्त्रियांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अथवा राजकीय क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचा एक प्रकारे सत्कार व कृतज्ञता व्यक्त करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. हे कार्यक्रम मानवी जीवनाच्या सर्व स्तरांवर साजरे करून लिंगभेद विरहित सर्वांना समान अधिकार असलेले जग निर्माण करण्याचा हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम होय. अशा उपक्रमातून आपण अगदी कौटुंबिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत, आपल्या सभोवती असलेल्या आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, शेजारीण, सहकारी, अधिकारी अशा विविध नात्यांतील सर्व स्त्रियांप्रति कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो. असे कार्यक्रम सर्व समाजाला एका दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करीत असतात. पण अनेकदा ही वरवरची मलमपट्टी ठरते. कारण असे उपक्रम अनेकदा सामाजिक दृष्टिकोनात मूलभूत बदल करण्यात अपयशी ठरतात.
ला कारण म्हणजे कोणाच्याही मनावर सर्व प्रथम कौटुंबिक वातावरण परिणाम करीत असते तसेच घरात वा कुटुंबात होणारे संस्कार अधिक खोलवर रुजतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र, कुटुंबात होणारे संस्कार हे धर्म संकल्पनांच्या आधारेच बिंबवले जात असतात. त्यामुळे स्त्रियांचे योगदान तसेच त्यांचे कौटुंबिक व सामाजिक स्थान हे त्या लोक समूहाच्या धर्म संकल्पनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. आज तरी स्त्रीला बरोबरीचेच नव्हे तर वरचढ स्थान देणाऱ्या संकल्पना फक्त हिंदू धर्मातच आहेत, हे अभिमानाने सांगायला हवे. त्याच वेळी इस्लाम धर्मात मात्र स्त्रीचे स्थान अत्यंत हीन दर्जाचे ठरवलेले आढळते. इस्लाम धर्मात जर स्त्रीला आदराचे स्थान दिलेले नसेल तर मुस्लिम समाजातही हे स्थान हीन दर्जाचेच असणार आहे.
सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे इस्लाममध्ये स्त्रीला भोगवस्तू समजले आहे. ‘सारे जग उपभोगण्यासाठी आहे, परंतु त्यातील सर्वांत उत्तम वस्तू म्हणजे चांगली स्त्री’ असे पैगंबरांचे हदिसच्या संदर्भातील सांगितले जाणारे वचन, अरुण शौरी यांनी त्यांच्या ‘वर्ल्ड ऑफ फतवाज’ या पुस्तकात पृष्ठ 352 वर दिलेले आहे. यावरून स्त्री ही जगातील सर्वोत्तम उपभोग्य वस्तू आहे, अशी इस्लामची धारणा आहे. यामुळे मग सर्वसाधारण सामाजिक धारणा हीच बनते. इस्लामनुसार स्त्रीला जन्नत म्हणजे स्वर्ग मिळूच शकत नाही. स्त्रिया कितीही धर्मपरायण असल्या, त्यांनी आपल्या कुटुंबाकरिता अथवा समाजाकरिता उच्चतम योगदान दिले असले, तरी त्यांच्यासाठी जन्नतमध्ये म्हणजे स्वर्गात जागा नाही. याला केवळ एकच अपवाद आहे. जर एखाद्या स्त्रीचा तिचा नवरा तिच्यावर खूश असतानाच मृत्यू झाला, तरच तिला स्वर्गप्राप्ती किंवा जन्नतमध्ये प्रवेश मिळतो, अन्यथा नाही. म्हणजे मुळात स्त्रीला स्वर्गात जागा नाही; फक्त अपवाद म्हणूनच त्यांच्या नशिबात जन्नत आहे. अर्थात सर्वसाधारण नियम स्त्रियांना जन्नतमध्ये स्थान नाही असाच आहे.
दुसरे म्हणजे स्त्रियांनी त्यांची दृष्टी नेहमीच जमिनीकडे ठेवली पाहिजे तसेच आपल्या लज्जा स्थानांचे, त्यावर आच्छादन घेऊन रक्षण केले पाहिजे. हे आच्छादन, आपला साजशृंगार परपुरुषांना दिसणार नाही असे असावे. म्हणजे ‘बुरखा’ हेच योग्य अंग आच्छादन ठरते. हे आच्छादन काही ठरावीक पुरुषांचा अपवाद सोडल्यास इतर पुरुषांपुढे दूर करू नये, असे कुराण सांगते. (सूरा क्र. 24, आयत क्र. 31) म्हणजे स्त्रीने सर्व परिस्थितीत नम्रता धारण करावी व सतत लज्जास्थानांचे रक्षण करण्यासाठी शरीरावर आच्छादन ठेवले पाहिजे.Women’s Day त्यांनी आपला तळहात व चेहरा इतर पुरुषांना दिसू नये म्हणून झाकणे आवश्यक आहे. इथे स्त्रीला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाकारलेले दिसते. त्याच वेळी मोमीन म्हणजे अल्लाह आणि पैगंबरावर श्रद्धा असलेल्या म्हणजे मुस्लिम स्त्रिया याच फक्त स्वतंत्र आहेत, असे म्हटले आहे. कारण गुलाम असलेल्या स्त्रीने मात्र आपला चेहरा वा लज्जास्थाने झाकण्यासाठी आच्छादन वापरण्यास कुराणात मनाई केली आहे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, जी स्त्री मोमीन म्हणजे मुसलमान नाही ती तसेच युद्धात जिंकलेली स्त्री गुलाम समजण्यात येत असे. स्त्रीने एकट्याने घराबाहेर पडू नये असे इस्लाम सांगतो. त्याच वेळी कोणत्याही परपुरुषाने एकट्यानेच एखाद्या स्त्री बरोबर असण्यास इस्लाममध्ये मनाई केलेली आहे. कोणत्याही स्त्रीने ‘महरम’ म्हणजे ज्या पुरुषाबरोबर तिचा कधीच विवाह होऊ शकत नाही असा पुरुष बरोबर असल्याशिवाय कोणताही प्रवास करू नये, अशी इस्लामची धर्माज्ञा आहे. महरम म्हणजे जन्मदाता बाप, सख्खा भाऊ असा पुरुष. म्हणजे एकीकडे स्त्रीला नखशिखांत आच्छादनात गुंडाळून इस्लाम दुसरीकडे तिला एकट्याने घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतो.
विवाह संबंधात दोघांनाही वेगळे (पुरुषाला तलाक तर स्त्रीला खुलआ) होण्याचे स्वातंत्र्य देणारा इस्लाम धर्म, पुन्हा एकत्र यायचे असल्यास मात्र अत्यंत विचित्र अशी हलालाची अट घालतो. पुरुषाने तलाक घेतल्यास त्याचा उच्चार तीन वेळेला होणे अनिवार्य आहे. मात्र पुरुषाने तलाक दिल्यास त्या स्त्रीला त्यापूर्वी दिलेले दागदागिने, जडजवाहीर परत घेण्याचा अधिकार त्या पुरुषाला नाही. एकदा तलाक झाल्यावर पुन्हा एकत्र यायचे असल्यास त्या स्त्रीचा दुसऱ्या पुरुषाशी विवाह होऊन शरीरसंबंध व्हायलाच हवेत. त्यानंतर दुसऱ्या नवऱ्याने तलाक दिला तरच ती स्त्री पुन्हा पहिल्या नवऱ्याशी विवाह करू शकते. जर कोणी एखाद्या स्त्री बरोबर लौकिक विवाह केला, पण शरीरसंबंध प्रस्थापित न करता तिला तलाक दिला तर ती अल्लाहची फसवणूक होते.
कुराण असेही सांगते की, (सूरा क्र. 4, आयत क्र. 3) तुम्हाला आपण सगळ्या पत्नींशी समान न्याय करू शकू असे वाटत नसेल तर त्यांच्याशी विवाह करू नका म्हणजे एकापेक्षा अधिक पत्नी करू नका. पण जर