जळगाव : हिंदूच्या हजारो युवतींना उद्धवस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच अयोध्येत आता प्रभू रामचंद्र यांचे भव्य मंदिर उभे राहत आहे. आता हिंदू राष्ट्र अर्थात रामराज्याचा दिशेने वाटचाल सुरु करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवार, २४ डिसेंबर शिवतीर्थ मैदानात ‘हिंदू राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समि तीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, या सभेत प्रमुख वक्ता म्हणून चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक तसेच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे म हाराष्ट्र छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट हे संबोधित करतील.
वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन
या सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या संदर्भात माहिती देणारे फलक, क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, काश्मिरी हिंदूवर झालेल्या अत्याचारांचे फलकः यांसह हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच हिंदू जागृती करणाऱ्या ग्रंथांचे, तसेच हिंदूना धर्मशिक्षण देणाऱ्या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येईल. सनातनची अनमोल ग्रंथ संपदा येथे उपलब्ध असेल.
११ तालुक्यात १५० हून अधिक गावात प्रचार : अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले
सभेसाठी जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, धरणगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा, पारोळा, जामनेर, अमळनेर या तालुक्यातील अनेक गावात प्रत्यक्ष प्रसार करण्यात आला आहे. महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, होर्डिंग, फलकलेखन, रिक्षा, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत. विधी क्षेत्रातील लोकांचाही यात सहभाग आहे. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनीही संबोधित केले.
सभेनिमित्त आज वाहन फेरी
सभेनिमित्त शुक्रवार, २२ डिसेंबरला सकाळी १० वाजता वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू चौक येथून फेरीला प्रारंभ होईल. शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतीर्थ, जिल्हाधिकारी कार्यालय, काव्य रत्नावली चौक, नूतन मराठा महाविद्यालय या मागनि जाऊन शिवतीर्थ मैदान येथे समारोप होईल.