Maharashtra: IPS अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती

#image_title

Maharashtra New DGP IPS Sanjay Varma: महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे डीजीपी (पोलीस महासंचालक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. IPS संजय वर्मा यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. विरोधी पक्षांकडून रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली होती.

रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन नावांचा समावेश होता. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय वर्मा यांचा अल्पपरिचय
IPS संजय वर्मा हे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सर्वोच्च रँकिंग आयपीएस अधिकारी आहेत. ते 1990 च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते एप्रिल 2028 मध्ये सेवानिवृत्त पोलीस सेवेतून निवृत्त होतील. गेल्या काही दिवसांपासून, महाराष्ट्र डीजीपी पदासाठी ज्यांची नावे चर्चेत होती अशा आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये ते आघाडीवर होते.