IRCTC Kedarnath Badrinath Package: ऑक्टोबर महिन्यात केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेचे प्लान करणाऱ्या जळगावकरांसाठी एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेने केदारनाथ-बद्रीनाथ दर्शनासाठी जाऊ इच्छिनाऱ्या भाविकांसाठी एक जबरदस्त पॅकेज आणले आहे. केदारनाथ- बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी हे खास पॅकेज असून या पॅकेजअंतर्गत भाविकांना भारत गौरव ट्रेनने प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे भुसावळातून प्रवास सुरु करत तुम्ही या पॅकेजचा लाभ घेऊ शकतो. चला जाणून घेऊया अधिक माहिती.
भारतीय रेल्वे, आईआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ – बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन धावणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने भारत गौरव मानसखंड एक्स्प्रेस ‘बद्री- केदार – कार्तिक स्वामी यात्रा’ हे १० रात्री/११ दिवसांचे टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेज अंतर्गत ऋषिकेश, रुदयप्रयाग, गुप्त काशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या ठिकाणी भेट देता येणार आहे.
या दिवशी सुरु होईल पॅकेज
भारत गौरव एक्स्प्रेसची ‘बद्री – केदार कार्तिक स्वामी यात्रा’ हे पॅकेज गुरुवार म्हणजे ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी २.०० वाजता सुरू होईल आणि १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचत पॅकेज समाप्त होईल.
भुसावळातून करता येईल प्रवास
जळगावरांच्या दृष्टीने हे पॅकेज सोईचे आहे. कारण या पॅकेजची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जरी होत असली तरी या पॅकेजअंतर्गत भारत गौरव मानसखंड एक्स्प्रेस ट्रेन कल्याण, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी हजरत निजामुद्दीन आणि हरिद्वार स्थानकावर थांबणार आहे. त्यानुसार, या पॅकेजची बुकिंग केलेले प्रवाशी वरिल कोणात्याही रेल्वे स्टेशनवरन प्रावस सुरु करु शकाता.
अशी आहे ट्रेनची संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, १० वातानुकूलित तृतीय, २ पॉवर कार आणि १ पँट्री कार (१४ कोच)
पॅकेजसाठी मोजावे लागतील इतके रुपये
भारत गौरव एक्स्प्रेसची ‘बद्री – केदार कार्तिक स्वामी यात्रा’ हे पॅकेज गुरुवार म्हणजे ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी २.०० वाजता सुरू होईल. तुम्हाला हे पॅकेज बूक करायचे असल्यास पॅकेजची किंमत जाणून घेतली पाहिजे. त्यानुसार, या पॅकेजला दोन पर्याय उपलब्ध आहे. एक म्हणजे डिलक्स पॅकेज ज्याच्यसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती ५९,७३० रुपये मोजावे लागतील. तर दुसऱ्या पॅकेजसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती ५६,३२५ रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागतील.
ही आहत पॅकेजची वैशिष्ट्ये
केदारनाथ येथे जाण्यासाठी कन्फर्म हेलिकॉप्टर तिकीट
होम स्टे / गेस्ट हाऊस / बजेट हॉटेल्समध्ये वातानुकूलित / गैर-वातानुकूलित कक्ष
ऑन बोर्ड ट्रेन जेवण
स्थानिक टूर एस्कॉर्ट्ससर्व प्रवाशांसाठी प्रवास विमा
भारत सरकारच्या संकल्पनेनुसार, ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालय देशाच्या विविध भागांतून भारत गौरव पर्यटक गाड्या चालवत आहे. भारत गौरव एक्स्प्रेसच्या ‘बद्री – केदार कार्तिक स्वामी यात्रा’ या पॅकेज संदर्भात अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकतस्थळाला भेट द्या.