Shirpur News : जय बालाजी… लक्ष्मी रमणा गोविंदा… च्या जयघोषात… श्री बालाजी रथोत्सव

शिरपूर :  ‘श्री व्यंकट रमणा…गोविंदा…, श्री भगवान बालाजी की जय’ असा भक्तिभावाने जयघोष करीत भाविकांनी श्रद्धेने श्री बालाजींचा रथ ओढला.  प्रति तिरुपती श्री बालाजी संस्थान मार्फत 155 वर्षांच्या परंपरा नुसार नवरात्रोत्सव कार्यक्रम झाला असून 14 ऑक्टोबर रोजी रथोत्सव कार्यक्रम खालचे गाव, शिरपूर येथे  उत्साह संपन्न झाला.

ब्रह्मोत्सव पूजा कार्यक्रम मुख्य आचार्य डॉ. पाराशरम भावनारायणाचार्यालूस्वामी (मुख्य सल्लागार, श्री तिरूमला तिरुपती देवस्थानम, तिरुपती आंध्र प्रदेश) यांच्या अधिपत्याखाली विविध कार्यक्रम झाले.

शके 1946, आश्विन शुद्ध भागवत एकादशी 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.15 ते 9.25 वाजेपर्यंत भव्य रथोत्सव पार पडला.  दिवाणी न्यायाधीश रमेश भद्रे व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते, सह दिवाणी न्यायाधीश पंकज जोशी, आमदार काशिराम पावरा, सह दिवाणी न्यायाधीश मयूर राणे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, श्री बालाजी संस्थानचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत रथोत्सव कार्यक्रम झाला.

यावेळी ह.भ.प. सतिषदास भोंगे महाराज, रवि शिल्पी, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, शरद अग्रवाल, राजू टेलर, कैलासचंद्र अग्रवाल, मंदिर स्वामी, पुजारी, अजय धर्माधिकारी, अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. मुरलीधर स्वर्गे यांनी केले.

प्रति तिरुपती श्री बालाजी संस्थानचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल, उपाध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष शैलेंद्र अग्रवाल, सहचिटणीस हिरालाल बारी, विश्वस्त चिंतनभाई अमरिशभाई पटेल, अभिमन भोई, डॉ. सुभाष भंडारी, गजानन कलाल, मुरलीधर स्वर्गे, विजय अग्रवाल, विजय धाकड, चंद्रकांत भावसार, सुरेश गुजराथी, दिपक बारी, सुभाष भोई, नितीन शिंपी, डॉ. नितिन वैद्य, स्विकृत सदस्य विलास देशपांडे, जितेंद्र जोशी, भरत गुजराथी, प्रदिप गुजराथी, गोपाल अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, प्रशांत शर्मा, राजेश भंडारी, राजेश बारी, हिरालाल माळी, महेश कोळी यांच्यासह खालचे गाव येथील श्री बालाजी मित्र मंडळ, न्यू बालाजी मित्र मंडळ, श्री सुर्यवंशी बारी समाज नवयुवक मंडळ, श्री भोईराज युवा प्रतिष्ठान, बालाजी भक्त यांनी बालाजी रथोत्सव कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.

यावेळी शिरपूर तालुका वारकरी संप्रदाय मंडळीच्या वतीने श्री बालाजी संस्थानला 5 हजार 100 रुपये ह.भ.प. सतिषदास भोंगे महाराज, ह.भ.प. प्रमोदजी भोंगे महाराज व वारकरी संप्रदाय मंडळी यांच्या हस्ते देणगी, भेट स्वरूपात देण्यात आले. रथोत्सव मार्गावर अनेक मित्र मंडळ, ट्रस्टी, नगरिक यांच्याकडून नाश्ता, चहा, पाणी, शीत पेय व्यवस्था करण्यात आली होती. प्रशांत बागुल यांच्या नाद कृष्ण ढोल व ताशा पथकाने सुंदर सादरीकरण केले.