---Advertisement---

Jalgaon : भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, दाम्पत्य रस्त्याखाली फेकले गेले, पती जागीच ठार

---Advertisement---

जळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात बांभोरी गावानजीक शनिवार, 27 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. हेमंत काशीनाथ चौधरी (50, खोटे नगर, जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे.

जळगाव शहरातील खोटे नगर परीसरात हेमंत चौधरी हे आपल्या पत्नी माधवी हेमंत चौधरी (45) यांच्यासह वास्तव्याला आहे. हेमंत चौधरी हे जळगाव शहरातील पोलनपेठ परीसरात मेडीकल डिस्ट्रीब्यूटर येथे नोकरीला होते. तर त्यांची पत्नी माधवी बांभोरी गावाजवळील जैन कंपनीत कामावर आहे. नेहमीप्रमाणे शनिवार, 27 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्नीला कामावर सोडण्यासाठी हेमंत चौधरी हे दुचाकीने खोटेनगराकडून जैनकंपनीकडे दुचाकीने निघाले.

जैनकंपनी जवळून जात असताना बांभोरी गावानजीक एका भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानंतर दाम्पत्य रस्त्याखाली फेकले जावून दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवल्यानंतर हेमंत चौधरी यांचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुपारी अडीच वाजता मृत्यू झाली. नातेवाईकांनी प्रसंगी मोठी गर्दी केली होती.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment