जळगाव जिल्ह्यात पुन्हा खून, जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाला संपवलं, काय कारण?

---Advertisement---

 

जळगाव : शहरासह जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दोन दिवसाआड खुनाच्या घटना समोर येत असून, या गुन्हेगारी वाढीमुळे नागरिक चिंतित आहेत. अशात पुन्हा खुनाची घटना समोर आली असून, जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी फोजफाट्यासह धाव घेतली. मयत मुलाचे नाव सचिन रवींद्र पाटील (वय ३२) असे आहे. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कुसुंबा खुर्द येथील रवींद्र पाटील व सचिन पाटील या बाप-लेकांमध्ये सातत्याने संपत्तीच्या कारणावरून नेहमी वाद होत होते. काल सोमवारी रात्री सचिनने पुन्हा दारू पिऊन वडील रवींद्र पाटील याच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन संतापलेल्या बापाने मुलाचे दोरीने हातपाय बांधून त्याच्या डोक्यात लाकडी मोगरी मारल्याने त्यात तो जागीच ठार झाला.

मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यावेळी उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस कर्मचारी सिकंदर तडवी, योगेश पाटील सुकेश तडवी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी फोरेन्सिक टीमने भेट देवून पाहणी केली आहे.

याबाबत पोलीस पाटील रईस तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात रवींद्र भगवान पाटील याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खून करणाऱ्या आरोपी पित्यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---