जळगाव: गुन्हेगारांचे दोन गट आमने सामने आल्यानंतर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर एकाने पिस्तुल काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याना धक्काबुक्की करत धमकाविले. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चेतन रमेश सुशिर (१९) पिंप्राळा हुडको, लखन दिलीप मराठे (३०) शिवाजीनगर हुडको, सोनू उर्फ ललित गणेश चौधरी (२९) ईश्वर कॉलनी, अतुल क्रिष्णा शिंदे (२५) रामेश्वर कॉलनी यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता.
दुपारी ३.३० वाजेच्या सुमाराला हे चौघे स्वातंत्र्य चौकात समोरासमोर आले. ते झोंबाझोंबी करू लागले. त्यामुळे सहायक पोलीस अधिकारी हा वाद मिटविण्यासाठी धावले. अंगझडतीत एकाकडे गावठी पिस्तुल मिळून आले. याबाबत विचारपूस केली असता संशयिताने त्यांना धक्काबुक्की करत धमकी दिली. पोलिसांनी संशयिताकडून पिस्तुल, तीन मोबाईल, असा ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. तपास मपोहेकॉ वंदना राठोड करत आहेत. गुरुवारी शहरात मोर्चा होता