जळगाव : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व कारागृहातील बंदीवान भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय ४०) याचा मंगळवार, ६ रोजी सकाळी ६.३० वाजता उपचार घेताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. घटना कळताच तुरुगांधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. आज दुपारी न्यायाधीश थेट रुग्णालयात जावून घटनेची माहिती घेतली. गुन्ह्यात अटक झाल्यापासून भीमा उर्फ पंकज वाणी कारागृहात बंदीवान म्हणून वास्तव्यास होता. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आजाराने तो ग्रस्त झाला. त्यामुळे कारागृह प्रशासनाने त्याला वेळोवेळी दहा-बारा वेळा जिल्हा रुग्णालयात दाखल करूरुन उपचार केले.
शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी भीमा उर्फ पंकज वाणी याची पुन्हा अचानक प्रकृती अस्वस्थ झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरूहोते. आज त्याची प्रकृती अधिक खालावली. उपचाराला प्रतिसाद मिळून शकल्याने सकाळी ६.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. घटना कळताच तुरुगांधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दुपारी दुसरे सहदिवाणी न्यायधिश क.स्तर व न्यायदंडाधिकारी प्र वर्ग न्या. आर.आय. सोनवणे हे रुग्णालयात पोहोचले.
शवविच्छेदन कक्षात जावून मृत भीमा वाणी यांचा मृतदेह पाहिला. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याच्या आजाराबद्दल तसेच उपचाराबद्दल माहिती घेतली. तुरुंग शासनाकडूनही त्याच्या प्रकृतीबाबत व उपचाराबद्दल चौकशी केली. घटना कळतात भीमा वाणी याच्या कुटुंबियासह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मयताच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान मृतदेह शीतगृहात ठेवण्यात आला आहे. काय आहे प्रकरण १८ एप्रिल २०१७ रोजी शनीपेठ परिसरात एका पत्त्याच्या क्लबमध्ये प्रवीण उर्फ नितीन सुरेश माळी या तरुणाच्या डोक्यात दगड टाकून हत्या झाली. याप्रकरणी भीमा उर्फ पंकज वाणी याच्यासह राहुल सपकाळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून भीमा हा कारागृहात बंदी म्हणून होता.