जळगाव : रस्त्याच्या कडेला किंवा पार्किंग केलेली दुचाकी चोरुन पसार व्हायचे. या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे निर्देश मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथक तपासाला लागले. गोपनीय माहितीवरुन पाच ते सात दिवस पाठपुरावा केला. त्यानंतर कारवाईत दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले. या संशयितांकडून तीन दुचाकी पथकाने हस्तगत केल्या. पवन उर्फ भांजे गणेश पाटील (वय २२), निखील जयराम पाटील (वय २१, दोन्ही रा. इंदिरानगर, कुसुंबा) अशी संशयितांची नावे आहेत.
भुषण रमेश झांबरे (रा.गाडेगाव) हे १९ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एमएच १९ बीएल ९३३४) ने जळगाव जात होते. उमाळा बस स्टँडजवळ ते थांबले. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात त्यांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. उमाळासह अन्य दोन दुचाकींची कुसुंबा शिवारातील काही जणांनी चोरी केल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथक नियुक्त केले. पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत संशयितांनी उमाळा बसस्टँडवरुन दुचाकीसह भुसावळ, जळगाव शहरातून दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना बुधवार, २ रोजी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पथकाने तीन दुचाकी हस्तगत केल्या. पोनि दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनात पोउनि दीपक जगदाळे, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पोकॉ नितीन ठाकुर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललीत नारखेडे यांनी केली.