---Advertisement---

Jalgaon Crime: तरुणावर चॉपर हल्ला, पोलिसात गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

जळगाव : शहरातील पायघन हॉस्पिटल जवळ कोणतेही कारण नसताना तरुणाला चॉपरने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली आहे. ही घटना रविवारी १९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २० मे रोजी मध्यरात्री २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचमुखी हनुमान मंदीर परिसरात अर्जून रोहिदास राठोड वय २४ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार १९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता तो पायघन हॉस्पिटलजवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी काहीही कारण नसतांना अनिल घुले व त्याच्या सोबत अनोळखी चार जणांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर अनिल घुले याने हातातील चॉपर काढून डोक्यात मारली. जखमी झालेल्या अर्जूनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी २० मे रोजी मध्यरात्री २ वाजता मारहाण करणारे महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी मोरे हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment