जळगाव : पूजा करण्याचे सांगून दागिने घेऊन भोंदूबाबाने पोबारा केला होता. शनिपेठ पोलिसांनी तपासातून हरीष ऊर्फ हरी गुलाब गदाई (रा. देवगाव राजापूर ता. पैठण) याला १८ रोजी ताब्यात घेतले. २६ जानेवारी २०२२ रोजी शहरातील आसोदा रोडवर महिलेकडे पूजेचा कार्यक्रम होता. येथे सोन्याचे मंगळसूत्र माळसह इतर दागिने ठेवले होते. – वास्तूदोष निवारणासाठी पूजा करावी लागेल, असे या बाबाने महिलेला सांगितले.
महिला किचनरुममध्ये गेल्यानंतर या बाबाने पूजेतील दागिने घेत पलायन केले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हेड कॉन्सटेबल – परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, भागवत शिंदे यांनी तपासचक्रे फिरवित हरीष उर्फ हरी गदाई याला ताब्यात घेत जळगाव येथे आणले. त्याच्याकडून मुद्देमाल पथकाने हस्तगत केला