Jalgaon Crime: दारू पिण्यास पैसे न दिल्याचा संताप बाटली टाकत तरुणाचे फोडले डोके

Jalgaon Crime: दारूरु पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली. मात्र जवळ पैसे नाहीत, असे तरुणाने सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने बर्फाच्या गाडीवर असलेली काचेची बाटली उचलत ती तरुणाच्या डोक्यात टाकली. ही घटना भागपूर येथे गुरुवार, ९ रोजी घडली. सुनील कैलास गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे.

सुनील गायकवाड हा भागपूर येथे कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरुवारी दुपारी सुनील गायकवाड जगन पावरी यांच्या शेतात होता. याठिकाणी गावातील अजय अरुण गायकवाड हा तरुण आला. त्याने दारू पिण्यासाठी सुनील याच्याकडे पैशांची मागणी केली. खिशात पैसे नाहीत, अस सुनील याने सांगितले. यामुळे अजय याला राग आला.

बर्फाच्या गाडीवरील काचेची बाटली उचलून त्याने डोक्यात टाकल्याने सुनील गायकवाड याला दुखापत झाली. प्रत्यक्षदर्शीनी त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. जखमीच्या जबाबानुसार नशिराबाद पोलिसांनी अजय गायकवाड याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील हे करीत आहेत.