जळगाव : दीड लाखाची महागडी सायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासात तपासचक्रे फिरवित रामानंदनगर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या अन्य चोरलेल्या सात सायकली आढळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच १८ वर्षीय संशयित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. २४ जानेवारी रोजी योगेश बडगुजर यांची स्पीड सायकल त्यांच्या घराच्या कंपाऊंटमधून चोरुन नेली. याप्रकरणी तक्रारीवरुन रामानंदगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संशयित युवकाने ही सायकल चोरल्याची गोपनीय माहिती प्रभारी सपोनी विठ्ठल पाटील यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.