Jalgaon Crime: लोखंडी रॉडने मारहाण, सहा जणांच्या हल्ल्यात तरुण जखमी

जळगाव : जुन्या वादाचे कारण पुढे करत सहा जणांनी तरुणाला गाठले. लोखंडी रॉडने मारहाण केली. एकाने बियरची बॉटल डोक्यात टाकत इतरांनी धुक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना ३० रोजी सायंकाळी शहरात विसावा हॉटेलजवळ रस्त्यावर घडली. नरेश मांगिलाल विश्वकर्मा हे मजुरी करुन कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात.

ते विसावा हॉटेल रस्त्याने जात असताना जुन्या वादाचे कारण पुढे करत विकी सोनवणे याच्यासह त्याची सहा साथीदारांनी नरेश याना गाठले. लोखंडी रॉडने त्याना मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या साथीदाराने बियरची बॉटल नरेशच्या डोक्यात टाकली. इतरांनी धक्काबुक्की केली. जीवे मारण्याचा दम भरला.

या प्रकरणी तक्रारीनुसार विकी सोनवणे, राकेश सुरवाडे, रितेश पवार, शुभम इंधवे, गोलू सोनवणे, परदेशी यांच्या विरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल किरण ठाकरे करीत आहेत