Jalgaon Crime : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरीच्या दुचाकीचा लावला शोध; एक जण ताब्यात

जळगाव :  हॉटेल सुयोगच्या समोरुन चोरुन नेलेल्या दुचाकी घटनेसंदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन तपासचक्रे फिरवित दाखल गुन्ह्याचा अवघ्या सहा वसात उकल केला. चोरीची दुचाकीसह संशयिताला ताब्यात घेतले. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या हॉटेल सुयोगच्या समोरुन हिरो होन्डा क्रमांक एम.एच.१९ ए.एम. ९२५५ ही चोरट्याने लांबविली.

याप्रकरणी शनिवार ३ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी सूचना केल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. अमित मराठे यांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन ते तपासले. तसेच ही दुचाकी कोणी चोरली यासंर्भात गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने संजय ओमकार गोंधळे (४७) रा. पवननगर जळगाव याला ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला सोबत घेत पथक त्याच्या घरी गेले असता त्याठिकाणी चोरीची दुचाकी मिळून आली. या गुन्हयात पथकाने त्यात तत्काळ अटक केली. पो.नि.डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात गुन्हे पथकातील पोहेकॉ सलिम तडवी, पोना जुबरे तडवी, पोकॉ मिलींद सोनवणे, पो.कॉ. अमित मराठे यांनी ही कारवाई केली.तपास पोहेकॉ निलेश भावसार करत आहेत.