---Advertisement---

Jalgaon Crime : चौघुले प्लॉट परिसरात मृत अर्भक आढळले, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

---Advertisement---

Jalgaon Crime : शहरातील कांचननगर परिसरातील चौगुले प्लॉट भागात मंगळवारी ३ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली. तीन ते चार महिन्यांचे एक मृत नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेने मानवतेला काळिमा फासत्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच, शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जातीसाठी दाखत के ते येथे कोणी टाकले, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या संदर्भात, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ९४ प्रमाणे शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment