---Advertisement---
Jalgaon Crime : घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडुन चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला. ६० हजाराची रोकड तसेच पाच हजार किमतीचे चांदीच्या देवांची मूर्ती असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेत चोरट्यांनी पोबारा केला.
ही घटना वाघनगर परिसरातील छत्रपती शिवाजी चौक पंचशिल सोसायटीत प्लॉट नं. ३२ अ येथे ९ जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अनिल नामदेव विश्वे (वय ६५, सेवानिवृत्त कर्मचारी) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. २७ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजाला कुलूप लावून ते गावाला गेले होते.
कुलुपबंद घर हेरत चोरट्यांनी या घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कडीकोयंडा तोडुन आत प्रवेश केला. लाकडी कपाटातील सामान फेकुन देत मौल्यवान वस्तुंचा शोध घेतला.
चोरट्यांनी ६० हजाराची रोकड तसेच पाच हजार किमतीचे चांदीच्या देवीची मूर्ती चोरुन नेली. याप्रकरणी तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे तपास करीत आहेत.