रावेर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्र विभागाने अवैध दारू धंद्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. अशातच रावेर तालुक्यातील पाडले येथे वन विभागाने वनक्षेत्र परिसरात सुरु असलेल्या गावठी दारू भट्ट्यांवर छापा मारला. यात २ लाख १९ हजार ७२५ रुपयांची तयार ४ हजार ५१४ ली दारू व कच्चे रसायन केले नष्ट केले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांच्या गोपनिय माहितीवरून पहिली कारवाई पाडले, कक्ष क्र. 1 आणि 2 मध्ये गंगापुरी धरण परिसरात केली. राखीव वनातून 5 अवैध गावठी दारू भट्ट्यां नष्ट केल्या. या कारवाईत भट्टी क्र.1- मोठे बॅरल 1 ,छोटे बॅरल -38 यात रक्कम 26 हजार 950 येवढ्या किमतीची अंदाजे 770 ली व भट्टी तयार करण्यासाठी लागणारे अंदाजे 5 हजार रुपये किमतीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले.
दुसरी कारवाई ही भट्टी क्र.2-मोठे बॅरल 1,छोटे बॅरल -45 याची किंमत 30 हजार 625 येवढ्या किमतीची अंदाजे 875 ली. दारू तसेच होंडा कंपनी ची MP 12 MA 7583 नंबरची मोटार सायकल अंदाजे किंमत 29 हजार तसेच तयार गावठी दारू 39 ली. त्याची किंमत 3900. दारु भट्टी साठी लागणारे इतर साहित्य किंमत 7000 असे साहित्य जप्त केले.
तिसरी कारवाई भट्टी क्र.3- मोठे बॅरल 1, छोटे बॅरल -30 याठिकाणी एकूण 22 हजार 750 किमतीची अंदाजे 650 ली.दारु तसेच भट्टी साठी लागणारे इतर साहित्य 6 हजार 500 असे साहित्य जप्त करण्यात आले.
चौथी कारवाई भट्टी क्र.4- मोठे बॅरल 1, छोटे बॅरल -42 याठिकाणी एकूण कच्छी दारू=24 हजार 900 रुपयाची अंदाजे 830 ली. वा इतर साहित्य 3 हजार 700 रुपयांचे साहित्य जप्त केले.
पाचवी कारवाई ही भट्टी क्र.5- मोठे बॅरल 3, छोटे बॅरल -50 याठिकाणी एकूण कच्ची दारू किंमत 47 हजार 250 रुपयाची 1 हजार 50 ली.दारू व भट्टी साठी लागणारे इतर साहित्य 8 हजार किमतीचे जप्त काण्यात आले.
जप्त व नष्ट माल
5 भट्टयांवर कच्च्या दारूचे रसायन अंदाजे 4 हजार 475ली. किंमत=1 लाख 56 हजर 625 रू. / गावठी तयार दारु 39 ली. किंमत 3 हजार 900. भट्टी साठी लागणारे इतर साहित्य इतर साहित्य किंमतअंदाजे=30 हजार 200 व जप्त मोटार सायकल यांची ऐकून अंदाजे रक्कम=29 हजार असे एकूण जप्त व नष्ट केलेल्या मालाची ऐकुन रक्कम 2 लाख 19 हजार 725 रुपयांचा नाशवंत मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.याप्रकरणी वनरक्षक पाडले खुर्द यांच्याकडे गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास वणपाल(आहिरवाडी )करीत आहेत.
यांनी केली ही कारवाई
ही कारवाई ही वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त निनु सोमराज , उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख , सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आली. ही कारवाई वनक्षेत्रपाल रावेर, अजय बावणे , वनरक्षक सुपडू सपकाळे, जगदीश जगदाळे, सविता वाघ,आयेशा पिंजारी, मंगला बारेला, संगीता बारेला, कियारसिंग बारेला , आकाश बारेला, निलेश बारेला, थावऱ्या बारेला , वाहन चालक विनोद पाटील , वनमजूर युनूस तडवी यांच्या पथकाने केली.