जळगाव : येथील तांबापुरा परिसरातील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेत जीवन यात्रा संपविल्याची घटना शुक्रवार, १३ रोजी पहाटे २ ते ३ वाजे दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इरफान शेख सुलतान (वय ३०, रा. तांबापुरा, पंचशील नगर जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
इरफान शेख हा मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. गुरुवारी रात्री तो परिवारासोबत जेवण करून झोपला. त्यानंतर मध्यरात्री दोन ते तीन वाजता त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. हीबाब कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुले ,आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.