Jalgaon District: जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट, रब्बी हंगाम धोक्यात

जळगाव : दोन दिवसापूर्वी हवामान खात्याने राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती. काल सोमवारी ( ता. २६ ) जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसासह गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सोमवारी (ता.२६) रात्री वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. ज्वारी, हरभरा व गहू यांच्यासह रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काल आलेल्या पावसामुळे हिरावला जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील पारोळा शहरासह तालुक्यातील करंजी बुद्रूक वेळी करंजी बुद्रूक, शेवगे बुद्रूक तसेच महाळपूर, बहादरपूर, शिरसोदे परिसरासह शेवगे प्र.ब, बोळे, ढोली, वेल्हाणे या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे.