जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तिकडून जीवे ठार मारण्याची धमकी ई-मेलवर देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सायबर शाखेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयात ई-मेलवर एका अज्ञात व्यक्तीने जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्यासंदर्भात धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी यांना जीवे ठार करण्याचा उल्लेख या ई-मेलम ध्ये आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या ई-मेलनुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून संबंधित धमकीचा ई-मेल गांभीर्याने घेण्यासारखा नसल्याचेही अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी म्हटले आहे.
सायबर शाखेत गुन्हा दाखल : पोलीस अधीक्षक
गेल्या महिन्याभरापूर्वी जिल्ह्यांतर्गत पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालयात काही दुखावलेल्या अज्ञात व्यक्तींच्या माध्यमातून ई-मेलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या धमक्या यापूर्वदिखील देण्यात आलेल्या होत्या. अशा प्रकारच्या धमक्यांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज नाही. यासंदर्भात आलेल्या ई-मेलचा तांत्रिक तपास सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येत असून आम्ही सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करीत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी म्हटले आहे.