Jalgaon Good News: जळगाव जनता बँक सन्मानित ; शून्य टक्के एन.पी.ए. पुरस्कार प्रदान

जळगाव :  पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे यांच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी करून बँकेचे एनपीए शून्य टक्के ठेवण्यात यश मिळाल्याबद्दल जळगाव जनता बँकेला शून्य टक्के एन.पी.ए. या पुरस्काराने शनिवार, दि. २८ रोजी सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील विजय तेंडुलकर सभागृहात जीवनगौरव पुरस्कार प्रदान आणि पुरस्कार वितरण समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली जळगाव जनता सहकारी बँक ही एक नामांकित शेड्यूल्ड सहकारी बँक आहे.

या कार्यक्रमास रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते व उपाध्यक्ष अॅड. साहेबराव टकले आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार बँकेला प्रदान करण्यात आला.

यावेळी जळगाव जनता बँकेच्या वतीने बँकेचे संचालक जयंतीलाल सुराणा, अधिकारी पंकज पाटील, देशपांडे, दिनेश मडके व बँकेचे वैदेही जितेंद्र रायसिंग यांनी पुरस्कार स्वीकारला. बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक यांचे सहकार्य व बँकेवरील विश्वास यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे, असे बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, बँकेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल सरोदे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांनी संचालक मंडळाच्या वतीने कळविले आहे