जळगाव : महापालिकेच्या सहआयुक्ता अश्विनी गायकवाड- भोसले या जामनेर वरून जळगाव येथे शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी येत असताना पळसखेडा येथील पुलावर त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाला. यावेळी प्रसंगावधान राखत त्यांनी हॅन्ड ब्रेक वेळीच ओढल्याने गाडी जागेवरच थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.
जळगाव महापालिकेच्या सहआयुक्त अश्विनी गायकवाड -भोसले या मुलीसह शुक्रवारी सकाळी जामनेर येथून जळगाव येथे येण्यासाठी स्वतः गाडी चालवत येत होत्या.
जामनेरच्या पुढे पळसखेडा गावाजवळ पुलावर गाडी येताच चालकाच्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने गाडी अनियंत्रित झाली. मात्र गायकवाड यांनी समयसुचकता दाखवत तत्काळ गाडीचा हॅन्ड ब्रेक ओढल्याने गाडीचा वेग कमी झाला आणि गाडी पुलाच्या कठड्यावर आढळून थांबली.
या घटनेत गायकवाड यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. सीट बेल्ट लावलेला असल्याने त्या व त्यांची मुलगी बचावल्यात.