खुशखबर ! रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार; दिवाळीनिमित्त भुसावळमार्गे धावणार विशेष रेल्वे गाड्या

जळगाव : आगामी दसरा, दिवाळी तसेच छटपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विशेषतः या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

काय आहे निर्णय ?
सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून चार विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. या चार नवीन रेल्वे गाड्या पैकी केवळ सीएमएसटी-गोरखपूर या गाडीला जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा असणार आहे, तर तीन गाड्यांना भुसावळ थांबा असणार आहे.

एलटीटी-नागपूर ०२१३९ व नागपूर-एलटीटी ०२१४० ही विकली स्पेशल गाडी ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत धावेल. सीएमएसटी- गोरखपूर ०१०७९ व गोरखपुर-सीएमएसटी ०१०/० टी 22 ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दररोज धावेल.

सीएसएमटी-अन्सोल ०११४५ व अन्योल सीएसागमती ०११४६ साप्ताहिक धावेल. एलटीटी मुंबई- दानपुर ०११४३ व दानपूर-एलटीटी मुंबई ०११४४ ही गाडी २२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर दररोज धावेल.

या विशेष गाड्यांचा वाढविला काळ
०११३९ नागपूर-मडगाव विशेष रेल्वेची सेवा २८ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. ०११४० मडगाव-नागपूर विशेष रेल्वे सेवा २९ डिसेंबरपर्यंत ०१२११ बडनेरा- नाशिक अनारक्षित रेल्वे व ०१२१२ नाशिक-बडनेरा अनारक्षित विशेष रेल्वे सेवा ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्यात येईल, रेल्वे क्रमांक ११०२५ दादर- बलिया रेल्वे ३० डिसेंबर, तर ११०२६ बलिया-दादर विशेष रेल्वेची सेवा १ जानेवारीपर्यंत आहे.