जळगाव : शहरातील दररोजचा कचरा उचलण्याचा मक्ता वॉटर ग्रेस या कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत शहरात साफसफाई केली जाते. वॉटर ग्रेस या कचरा संकलन करणाऱ्या कंपनीकडून दिवसाला तीनशे टन कचरा उचलण्याचा दावा करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात तेवढा कचरा उचलला जात नसल्याचे शहराच्या परिस्थितीवरून समजते. आजस्थितीत शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीगचढ़ीग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वॉटर ग्रेसकडून करण्यात येणाऱ्या कचरा संकलनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पाच वर्षाच्या कालावधीसाठी वॉटग्रेस या कंपनीला शहरातील कचरा संकलनाचा मक्ता ७५ कोटीला देण्यात आता होता. त्यास पाच महिन्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.
महिन्याला लाखोंने रक्कम शहरातील कचरा संकलनासाठी या कंपनीला महापालिका देत आहे. मात्र शहरातील कचयाची अवस्था जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. तत्कालीन नगरसेवकांनी महापालिकेत पदाधिकारी असताना महापालिकेत पदाधिकारी असताना कचरा संकलनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. महापालिकेच्या बैठकांमध्येही हा विषय गाजला आहे. मात्र संबंधित कचरा संकलन करणाऱ्या कंपनीवर कारवाई झालेली नाही. घंटागाडीमध्ये कचऱ्यात माती मिसळत्याचे आढळून आल्यानंतर मक्तेदार कंपनीवर दंडही आकारण्यात आला. मात्र मक्तेदार कंपनीवर ठोस कारवाई झाली नाही. शहरातील कोणत्याही वॉर्डात गेल्यास प्रत्येक ठिकाणी उघड्यावर कचरा पडलेला दिसून येतो. मक्ता घेणारी कंपनी नियमित कचरा उचलण्याचा दावा करीत असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती त्या ठिकाणची वेगळीच पाहायला मिळत आहे. जीबीएसचा पाहायला मिळत आहे.
जीबीएसचा महापालिकेने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने कचरा संकलनासाठी ठरावीक परिसरात लक्ष दिले जात आहे. मात्र इतर ठिकाणी शहराच्या मुख्य भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले कायम दिसून येते. कचरा संकलनाचा ठेका पाच वर्षांसाठी या कंपनीला ७५ कोटीला देण्यात आला आहे. शहरातील महाबळ परिसरातील संभाजी चौक, संत गाडगेबाबा चौक, रामानंद नगर, हरिविठ्ठल नगर, वाघ नगर या परिसरात कचऱ्याचे ढीग अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडलेले आहेत. महाबळ परिसरातील शासकीय निवासस्थाने असलेल्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यांसमोर कचराकुंड्या रस्त्यावरच भरलेल्या अवस्थेत आढळून येतात. शहरात वॉटरग्रेस कंपनीकडून ८५ घंटागाड्याच्या माध्यमातून कचरा संकलित केला जात आहे. या कचरा संकलनाच्या मक्त्याची मुदत संपली असून पाच महिन्यापासून या कंपनीला मुदतवाढ दिली आहे.
सुका, ओला एकाच ठिकाणी जमा
सुका व ओला कचरा संकलनासाठी वॉटरखेसच्या घंटागाड्या वॉर्डनिहाय पहाटेपासून कामकाजास प्रारंभकरतात. घंटागाडीवर सुका व ओता कचरा, अशा दोन प्रकारचे कप्पे वेगवेगळे केलेले असतात. त्यानुसार नागरिकांकडून कचरा सुका व ओला कचरा संबंधित कप्प्यामध्ये टाकण्याचा आग्रह धरला जातो. मात्र ज्या ठिकाणी हा कचरा टाकला जातो. त्या ठिकाणी सारा कचरा एकत्र पडलेला दिसून येतो. त्यामुळे घंटागाडीत सुका व ओला कचरा वेगवेगळा जमा करण्याचे कारण काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कुठे दिवसाआड तर काही ठिकाणी दोन दिवसांनी घंटागाडी
शहरातील बहुतांश परिसरात कुठे दिवसाआड घंटागाडी येते, तर काही ठिकाणी दोन दिवसांनी घंटागाडी कचरा संकलनासाठी येते. त्यामुळे शहरात घरांमधून निघणान्या कचऱ्याचे प्रमाणही मोठे आहे. दिवसाला तीनशे टन कचरा प्रत्यक्षात वॉटस्पेस कंपनी उचलते का? हा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे. घंटागाडीअभावी काही परिसरात दोन दिवसांचा कचरा नागरिकांच्या घरातच पडून रहात आहे. त्यामुळे मच्छर, डासांच्या उत्पत्तीला चालना मिळत आहे. त्या अनुषंगाने दररोज घंटागाडीची नागरिक प्रतीक्षा करतात.
उयड्यावरील कचऱ्याचीही विल्हेवाट
शहरातील ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा फेकला जातो. असे स्पॉट शोधण्यात आले आहेत. त्या ठिकाणी कचराकुंड्याही ठेवण्यात आल्या आहेत. मात्र शहरातील काही वॉडाँमध्ये उघड्यावरील कचरा उचलण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या मक्त्याची मुदत संपली असून पाच महिन्यांपासून
मुदतवाढ या ठेक्यास देण्यास आली आहे. – उदय पाटील, साहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग महापालिका