जळगाव : यावल तालुक्यातील मनवेल गावात एका विवाहित तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तरूणी मागील तीन वर्षापासून आपल्या पतीपासुन घटस्फोट घेऊन माहेरी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलेले याची माहिती अदयाप मिळू शकली नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा जितेंद्र कोळी वय २५ वर्ष (रा.मनवेल ता. यावल) या विवाहित तरुणीने सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरातील घरातील छताच्या लाकडी दांडयाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचा स्थितीत आढळून आल्या. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुष्पा कोळी यांचीतपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. तरुणीने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.