जळगाव : थकबाकी मिळकत धारकांसाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या अभय शास्ती योजनेचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत. या योजनेत २६ पर्यंत १ कोटी ३४ लाखाचा भरणा झालेला आहे. तर २८ थकबाकीदारांचे नळसंयोजने बंद करण्यात आली आहेत. प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ अंतर्गत ज्या मिळकत धारकांकडे थकबाकी कराचा भरणा करणे बाकी आहे अशा मिळकत धारकांना म नपाकडून जप्तीचे अधिपत्र बजावणी झाल्यावर सुद्धा थकबाकी कराचा भरणा अद्याप पावतो केलेला नाही अशा थकबाकी मिळकत धारकांचे एकूण २८ नळ संयोजन बंद करण्यात आली आहेत. मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ६.४५,५१,१७१ रूपये इतकी थकबाकी कराचा भरणा करून थकबाकी मिळकत धारकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेतलेला आहे.
उरले दोन दिवसअभय शास्ती योजनेचे उर्वरित शेवटचे २ दिवस बाकी राहिले असून यानंतर मालमत्ता करावरील शास्ती माफीच्या योजनेस मनपा प्रशासनाकडून मुदतवाढ दिली जाणार नाही, असे मनपातर्फे कळविण्यात येत आहे. थकबाकीदारांनी आपल्या मिळकतीवरील जप्तीची अप्रिय कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर मुदतीत थकबाकी कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त (महसूल) निर्मला गायकवाड (पेखळे), सहाय्यक आयुक्त (महसूल) गणेश चाटे यांनी केले आहे.