जळगाव : महाबळकडील संत गाडगेबाबा चौकात नव्याने तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्याला पाझर फुटला आहे रस्त्याखालून पाणी उसळी घेत वाहत आहे गेल्या चार महिन्यांपासून हे पाणी वाया जात असून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्तव्यदक्ष अभियत्यांना मात्र हे दिसत नसल्याने लाखो लिटर शुध्द पाणी गटारीत वाहून जात आहे. संत गाडगेबाबा चौकातील रस्त्यांवर डांबरीकरणाचा एक थर देण्यात आला आहे
त्याखाली अमृत योजनेची नविन जलवाहीनी टाकलेली आहे या जलवाहीनीला गेल्या तीन ते चार महिन्यांपासून गळती लागली असून जवळच असलेल्या व्हॉलमधुनही पाणी वाहत आहे जणू काही फुटला पाझर या चौकात जलवाहीनीला चार ते पाच ठिकाणी गळती लागली आहे डांबरी रस्त्याखालून हे पाणी उकळत्या पाण्याप्रमाणे बाहेर येत वाहत आहे. हे पाहून जणू काही डांबरी रस्त्याला पाझरच फुटला की काय असे वाटते. अभियत्यांचे दुर्लक्षच याबाबत महाबळ पाणी पुरवठा विभागाच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय पाटील यांच्याशीही संपर्क केला असता
त्यांनी त्यावेळी व्हॉलमनशी संपर्क साधण्याचे सांगीतले होते त्यानुसार व्हॉलमन अशोक मराठे यांच्याशी तीन महिन्यांपुर्वी संपर्क साधला असता वरिष्ठांना कळविले आहे साहित्य आणले की दुरूस्त करणार असल्याचे व्हॉलमन अशोक मराठे यांनी सांगीतले होते परंतु चार महिने होत आले तरीही ही गळती दुरूस्त करण्यासाठी अभियंत्यांना वेळच मिळालेला नाही. गळतीचे ऑडीट करण्याची मागणी मागील वर्षभरात पाणीपुरवठा विभागाने १९०० गळत्यांची दुरूस्ती केली यानंतरही गळती होत असल्याने या कामाचे ऑडीट करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षा पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहीनींना गळती लागून लाखो लिटर पेय जल चक्क गटारीत वाहत जात आहे याबाबत अभियंत्यांना माहिती देवूनही अभियंते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत त्यामुळे आयुक्त याकडे गंभीरपणे लक्ष देतात की त्याही दूर्लक्ष करतात याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.