जळगाव : अल्पवयीन मुलांशी मैत्री करीत त्याला हॅरेशमेंट करण्याच्या हेतूने सोबत घेवून गेले. त्याचा अश्लिल व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितली. हा घृणास्पद प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक संदीपकुमार गावीत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. रुपेश प्रभू बनसोडे, अजय लक्ष्मण गरुड तसेच सुरज गणेश चौधरी असे अटकेतील संशयित असून ही टोळी असण्याची शक्यता पोलीस उपअधिक्षक गावीत यांनी व्यक्त केली.
सोळा वर्षीय मुलगा ११ वीचे शिक्षण घेत आहे. काही महिन्यापूर्वी त्याने शहरातील स्विमींगसाठी स्टेडीयमला क्लास लावला. येथे सोनू नावाच्या मुलासोबत त्याची ओळख झाली. १७ जानेवारी रोजी या मुलाची पुन्हा त्याच्याशी नेहरू चौकात भेट झाली. सोनू आणि अल्पवयीन मुलगा बोलत असताना गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ तीन अनोळखी मित्र आले. त्यांनी आम्ही जे बोलतो तसे तु कर अन्यथा जिवानिशी मारु असा दम भरला. जवळ निर्मनुष्य ठिकाणी नेवून त्याचे अंगातील कपडे काढले. त्याच्यासोबत सेक्सशूअल हरॅशमेंट करण्याच्या इराद्याने त्याला अश्लिल कृत्य करण्यास सांगण्यात आले. त्याचा व्हिडीओ ही तयार करीत होते. हा व्हिडीओ व्हायरल करुन तु चुकीचे काम करतो, असे पोलिसांत सांगू अशी धमकी दिली. त्याच्याकडे बदल्यात ३० हजाराची खंडणी मागितली.
या प्रकाराने अल्पवयीन मुलगा प्रचंड घाबरला. या मुलाने त्याच्या मित्रांना माझ्या मित्राच्या वडिलांचा अपघात झाला असून त्यांच्याकडून सुरज परदेशी याच्या मोबाईलवर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. अन्य पैश्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी घरात चोरी करीत असा सल्लाही दिला. याप्रकरणी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी रात्री एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर अन्य दोघांनाही अटक केली. चंदू याचे पूर्ण नाव माहित नाही याचा शोध पोलिस घेत आहेत. जळगाव शहरात अल्पवयीन मुलांना गाठून त्यांचे अनैसर्गिक कृत्याचे व्हिडीओ तयार करायचे. त्यानंतर पिडित मुलांना हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागायची
असे प्रकार कोणाबाबत घडले असल्यास तत्काळ तक्रार करावी किंवा अशी माहिती असल्यास द्यावी, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत यांनी केले आहे. या गुन्ह्याचा तपासाधिकारी सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून यात अन्य साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्याअनुषंगाने तपासाची चक्रे फिरविली जात आहे.